सोन्या चांदीच्या भावात मोठी तेजी, सोन्याची किंमत ६० हजार होण्याची शक्यता
खान्देश लाईव्ह | ५ मार्च २०२२ | रशिया आणि युक्रेन युद्धाची झळ जागतिक बाजारावर होत असल्याचे दिसून आले. युद्धाने होणारे दूरगामी परिणामी लक्षात घेता बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीला पसंती दिली आहे. सोन्याच्या किमतीमध्ये मागील काही दिवसात चढ-उतार सुरु आहे. भारतीय सराफा बाजारात १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,७०० रुपये आहे. जागतिक वित्तीय बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने मागील काही दिवसात सोन्याच्या भावात मोठी तेजी आहे.
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,४०० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,४००, बुधवारी ५३,०३०, गुरुवारी ५२,५०० , शुक्रवारी ५२,९८० रुपये इतका होता. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,०४० प्रति १० ग्रॅम आहे. तर चांदीच्या भाव बघता सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६५,५२० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,५२०, बुधवारी ६८,५७०, गुरुवारी ६८,५३०, ६९,५०० रुपये प्रति किलो इतका होता.
या युद्धाचे दुष्परिणाम त्या देशांनाही सहन करावे लागत आहे. वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ आणि भू-राजकीय तणाव या कारणांमुळे देशांतर्गत सोने मार्केटमध्ये सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम जागतिक बाजारासह देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून येत आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास सोन्याची किंमती 60 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतात.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम