रश्मी शुक्ला विरोधात गुन्हा दाखल, संजय राऊतांसह एकनाथ खडसे यांच्या फोन टँपिंग
खान्देश लाईव्ह | ५ मार्च २०२२ | राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगच्या आरोपाखाली मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा फोन टॅपिंग केलाच गुन्हाचा उल्लेख एफआयआर कॉपी मध्ये करण्यात आली. यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालीय.
काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम २६ तसेच भादवि कलम १६६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
टेलिग्राफ ऍक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. फोन टॅपिंग प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने २५ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते.
एकनाथराव खडसे यांचा फोन टॅप करण्यात आला तेव्हा ते भाजपमध्ये होते. यामुळे एकीकडे विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करतांना भाजपमधीलच नाथाभाऊ आणि तेव्हा मित्रपक्ष असणार्या शिवसेनेतील संजय राऊत यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप हा राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारा ठरला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम