काही दिवसांत पट्रोल डिझेलच्या किंमतीत होणार 12 रुपयांची वाढ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ मार्च २०२२ | गेल्या मागील काही दिवसापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आता देशांतर्गत त्याची झळ सहन करावी लागणार आहे. तसेच आगामी काळात पट्रोल डिझेलचे भाव सुद्धा वाढणार आहेत, सध्या बाजारात इंधनाचे दर स्थिर असले तरी येत्या १० दिवसांत हेच दर १२ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे. तर मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर १०९. ९८ रुपये तर डिझेल ८४. २४ रुपये इतका आहे. गेल्या दोन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्यामुळे, सरकारी मालकीच्या किरकोळ विक्रेत्यांना खर्च वसूल करण्यासाठी १६ मार्च रोजी किंवा त्यापूर्वी इंधनाच्या किमती प्रति लिटर १२.१ ने वाढवल्या जातील.

त्याचवेळी तेल कंपन्यांचे मार्जिन जोडल्यास यात प्रति लिटर 15.1 रुपयांनी दरवाढीची आवश्यकता आहे. तसेच देशातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा भाव वाढतील असं बोललं जात आहे. सध्या भाव स्थिर असले तरी येत्या १० दिवसांत दर १२ रुपयांनी किमती वाढण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like