भाऊ खूप मोठे philosopher, भाऊ कदमच्या वाढदिवसानिमित्त श्रेया बुगडेने व्यक्त केली भावना

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ मार्च २०२२ | कॉमेडीचं भन्नाट टायमिंग, अभिनय कौशल्य यामुळे भाऊ कदम रसिकांचा लाडका बनला आहे. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील त्याची एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे भाऊ रसिकांना खळखळून हसवण्यास भाग पाडतो.

चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील भाऊ तर निव्वळ अप्रतिम. त्यामुळेच भाऊ केवळ चाहत्यांचा लाडका नाही तर त्याच्या सहकलाकारांचाही लाडका आहे.श्रेया बुगडेची भाऊ कदम यांच्यासाठी लिहिलेली ही पोस्ट आहे. काल भाऊचा वाढदिवस साजरा झाला. यानिमित्त श्रेया बुगडेने भाऊसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

भाऊ अगदी खरं सांगू तर तुम्ही एक खूप मोठे philosopher आहात, तुम्ही तुमच्या सहज वागण्यातून खूप गोष्टी शिकवता. जसं की कितीही टेन्शन असलं तरी माणसाकडे एक डुलकी काढण्या इतका वेळ असतोच. आपण वयाने कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल मोठं होऊ द्यायचं नाही आणि आयुष्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद वेचणे. श्रेया बुगडेने भाऊसाठी लिहिलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.

1991 साली भाऊ कदमनं अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. भाऊच्या करियरमधील प्रत्येक चढउतारा दरम्यान त्याची पत्नी ममता कदम त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी ठाकली. भाऊ आणि ममता यांच्या सुखी संसारात त्यांच्या तीन मुलीही आहेत. इतकं यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही भाऊ कदममधील साधेपणा आजही कायम आहे. आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत.

भाऊंच साधी राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे भाऊ कदम आज रसिकांचा लाडका बनला आहे. भाऊ कदम यांच्या अचूक कॉमेडी टायमिंग आणि निरागस विनोदाने सर्वानांच वेड लावलं आहे. त्यामुळे रसिकही मोठ्या अभिमानाने म्हणतात भाऊ कदम रॉक्स !महाराष्ट्राच्या सुपरस्टारला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा’..

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like