पिंप्री खुर्द येथे दोन घरांमधील हजारोंचा ऐवज लांबविला
खान्देश लाईव्ह | ७ नोव्हेंबर २०२२ | एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे आज सकाळी उघडकीस आली. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
जुना चिकूचा मळा, पिंप्री खुर्द येथे राहत असलेल्या लोटू मुरलीधर पाटील (वय – ७३) यांच्या बंद घराच्या कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाटील हे दोन दिवसांपासून बाहेगावी होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच यांच्या घराच्या शेजारी असलेले संदिप किसन खंडू शिंदे (वय – ३८) हे खाजगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यांचे घर देखील फोडण्यात आले. परंतू, श्री.शिंदे यांच्या घरातील काहीही वस्तू चोरीस गेली नसल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सपोनि. जिभाऊ पाटील, सहा. फौजदार राजेंद्र कोळी, मोती पवार, समाधान भागवत पोहेका करीम सय्यद , कैलास पाटील , समाधान भागवत आदींसह श्वान पथकासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल असून चौकशी सुरु आहे. तसेच, ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, चोरट्यांनी पाटील यांच्या घरातून ५० हजाराची रोकड आणि साडेपाच तोळे सोने लंपास केल्याचेही समजते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम