केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे जळगावात कुस्त्यांची दंगल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ७ नोव्हेंबर २०२२ | केशवस्मती प्रतिष्ठानतर्फे जळगाव शहरात श्रीराम रथोत्सवानिमित्त जी.एस. मैदानात रविवारी कुस्त्यांची दंगलीचे उद्घाटन जिल्हा क्रिडा अधिकारी मिलींद दिक्षीत यांच्याहस्ते करण्यात आले. दंगलीत जिल्हाभरातील मुलींनी देखील सहभाग नोंदविला होता.

श्रीराम मंदिराच्या रथोत्सवानिमित्त गेल्या ७ वर्षांपासून केशवस्मृतीच्या वतीने दरवर्षी कुस्तीचे दंगल आयोजित केले जाते. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील विविध भागातून मल्ल यात सहभागी झाले होते. रविवारी ६ नोव्हेंबर रोजी शहरातील शिवतीर्थ मैदानावर दुपारी ३ मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे येथील पैलवान भारत मदाने व जॉर्जिया देशातील पैलवान टॅडो जार्जिया यांच्यातील ही कुस्ती लक्षवेधी ठरली. या कुस्ती महोत्सवात राज्यासह इतर राज्यातील खेळाडू सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील मुलींनी देखील कुस्ती दंगलीत सहभाग नोंदविला होता.
या कार्यक्रमाला जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष शांताराम सोनवणे, उद्योजक श्रीराम पाटील, भागवत भंगाळे, पोउनि संदीप परदेशी, प्रभाकर पाटील, मनिषा खडके, केशवस्मृतीचे सचिव रत्नाकर पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like