आविष्कार संशोधन स्पर्धा ११ व १२ नोव्हेंबर रोजी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ७ नोव्हेंबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा ११ व १२ नोव्हेंबर रोजी होत असून यामध्ये २८८ मॉडेल्स व पोस्टरचे सादरीकरण केले जाणार आहे. या स्पर्धेची तयार पूर्ण झाली असून सोमवारी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला.

गेल्या महिन्यात जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा झाली. या स्पर्धेतून निवडण्यात आलेले स्पर्धक आता विद्यापीठस्तरीय आविष्कार मध्ये सहभागी होणार आहेत. ४४५ विद्यार्थ्यांव्दारे २८८ मॉडेल्स व पोस्टर्स चे सादरीकरण या दोन दिवसीय महोत्सवात केले जाणार आहे. या स्पर्धेत २५४ विद्यार्थिनी व १९१ विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धेचे समन्वयक प्रा. एस.आर. कोल्हे यांनी दिली. शेती आणि पशूपालन या विषयात ३४ तर वाणिज्य व व्यवस्थापन आणि विधी या विषयात ३२, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयात ३०, मानव्य विद्या भाषा आणि ललितकला विषयात ६०, औषधीनिर्माण विषयात ४४ आणि निव्वळ विज्ञान विषयात ८८ अशा एकूण २८८ प्रवेशिका स्पर्धेत आहेत. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक या गटात ही स्पर्धा होणार आहे.
शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते होणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात दिवसभर आपल्या पोस्टर व मॉडेल्सचे सादरीकरण विद्यार्थी करतील. शनिवार दि.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार असून त्यासाठी नॅचरली युवर्स बायोटेक, जळगावचे व्यवस्थापक डॉ.निलेश तेली व नोव्होटा थर्माटेक प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक आर. वाय. चौधरी हे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान या स्पर्धेसाठी स्थापन झालेल्या विविध समित्यांच्या कामकाजाचा आढावा सोमवारी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील व समित्यांचे समन्वयक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like