समाजासमोर ठरला आदर्श, साखरपुड्याच्या दिवशी उरकून टाकला विवाह

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २२ मार्च २०२२ | सध्या मुस्लिम समाजामध्ये साध्या पद्धतीने व कमी खर्चात लग्नसोहळा पार पाडण्याची प्रथा लागू होण्याच्या उद्देशाने कार्य चालू आहे. रावेर येथे खिर्डी येथील शेख शाहरुख शेख भिकन हे साखरपुड्यासाठी गेले असता तिथून थेट लग्न लावून आले. या प्रकारे त्यांनी समाजात एक आदर्श त्यांच्या या कार्याची परिसरात भरभरून कौतुक होत आहे.

इस्लाम धर्मातील प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकविण्यास अनुसरून लग्न हे साध्या पद्धतीनेच करण्याचे सांगितले आहे. परिस्थिती नसताना सोगा ठोंगात लग्न करण्याची आता गरज नाही. रावेर तालुक्यातील खिर्डी येथील शेख शाहरुख शेख भिकन याचा रावेर येथील शेख शाफिक यांच्या मुलीचा लग्न काही दिवसांपूर्वी ठरला होता. दि २० रविवार रोजी मोजक्या पाहुण्यांना घेऊन ते रावेर येथे साखरपुड्या साठी गेले होते. कमी खर्चात आणि कमी वेळेत २ कार्यक्रम १दिवसात उरकण्यात आला.

चिनवाल येथील शेख इरफान शेख कुतबुद्दीन,निसार खान,निसार शेख,खिर्डी येथील साबीर बेग,वसीम खान,अमजद खान,यांनी वधू व वर यांच्या कुटुंबाला साखरपुड्यातच लग्न संपन्न करा असा सल्ला दिला असता दोन्ही किटुंबांनी यात सहमती दर्शविली. येथे वाड्यातील युवा मंडळी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. साखरपुड्याचा रूपांतर लग्न झालं. परिसरात त्यांच्या या कार्याचा भरभरून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like