जळगाव पोलिस कर्मचाऱ्याचे हृदय विकार झटक्याने निधन, मात्र प्रकरण होतं ‘हे’….
खान्देश लाईव्ह | २१ मार्च २०२२ | जळगावचे पोलीस कर्मचारी श्रीराम रामदास वानखेडे (वय 53, रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव) हे रावेर येथे बंदोबस्तावर होते. कर्तव्यदक्ष असणाऱ्या जळगावच्या पोलीस कर्मचाऱ्याला हृदविकाराचा झटका आल्याने त्यांना नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असे समजले गेले.
मात्र, विशेष बाब म्हणजे पोलीस उपमहानिरीक्षकांच्या सहीचा हट्ट धरत हा मृतदेह पाच ते सहा तास अडवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलिसांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. शेवटी एका राजकीय कार्यकर्त्याने व्यवस्थापकाला धारेवर धरत हा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
या पोलिसाला ह्रदय विकाराचा झटका आल्याने, तातडीने जळगावला नेत, रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी मध्यरात्री मृत्यू झाला. या रुग्णालयात मेडिक्लेमची सुविधा आहे. मात्र, वानखेडे यांना मृत घोषित करण्यापूर्वी हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांच्या जवळपास 35 कागदपत्रांवर सह्या घेतल्या. त्यानंतर मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, मृतदेह देण्यास नकार दिला.
खरे तर, उपमहानिरीक्षक यांच्या स्वाक्षरीची गरज हॉस्पिटल प्रशासनाला होती. त्याशिवाय कागदपत्रे पूर्ण होणार नव्हती. ही सही मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाने घेतली. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनीही हॉस्पिटलला सही नंतर मिळेल. मृतदेह द्यावा, अशी विनंती केली. मात्र, रुग्णालयाने त्यांनाही जुमानले नाही. शेवटी प्रहार संघटनेचे अनिल भडांगे यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला धारेवर धरले. त्यानंतर मृतदेह देण्यात आला. या प्रकाराने पोलीस दलामध्ये संताप निर्माण झाला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम