आजपासून जिल्हा परिषदेत प्रशासक राज सुरू, पंकज अशिया यांची निवड

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २१ मार्च २०२२ | जळगाव येथील जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची पंचवार्षिक 25 मार्च रोजी संपली आहे आणि आज सोमवारपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज येणार असल्याचं समोर आलं आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांची शासनाकडून प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे प्रशासक राज सोमवारपासून ते निवडणूक होईपर्यंत जिल्हा परिषदेवर प्रशासकाचे नियंत्रण ठेवेल. जिल्हा परिषदेची पंचवार्षिक मुदत संपली असून निवडणुका न झाल्याने आता जिल्हा परिषदेवर देखील पदाधिकाऱ्यांची सत्ता अधिकार संपुष्टात आली आहे.

त्याचप्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींची त्यांची दालने, वाहने व निवासस्थाने सर्व सोडावी लागणार आहेत. रविवारी या पदाधिका-यांचे पद व पदा सोबत मिळालेले कायदेशीर अधिकार देखील संपुष्टात आले असून त्यांना ते सोडावे लागणार आहे. सोमवारी मात्र अध्यक्ष पदी आपला पदभार मुख्य कार्यकारी सर्व अधिकार डॉ. पंकज आशिया यांच्याकडे सोपवण्यात येऊन जिल्हा परिषदेवर प्रशासक राज सुरू होणार आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like