कुटुंबाकरिता डॉ. स्मिता जोशी यांनी महिला मेळाव्यात केले समुपदेशक
खान्देश लाईव्ह | २२ मार्च २०२२ | भारतीय संस्कृती ही जगात महान आहे. प्रत्येकाने या संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे. असाच कार्यक्रम शहरातील संत नरहरी सोनार बहुद्देशीय संस्था मेहरून, जळगाव संचालित वाघेश्वरी महिला मंडळातर्फे नुकताच राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.या वेळी शहरातील कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक डॉ. स्मिता जोशी यांनी महिला मेळाव्यात मांडले.
राधाकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात याप्रसंगी त्या व्यासपीठावर ज.श.म.न.पाच्या महापौर जयश्री महाजन, अध्यक्षस्थानी सरस्वती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पूजा पातोंडेकर, रंजना वानखेडे, नगरसेविका वैशाली विसपुते, लतामोरे सामाजिक कार्यकर्त्या सरिता माळी, दापोरेकर ज्वेलर्सच्या विद्या दापोरेकर, शोभा चौधरी, निर्मला बागुल, डॉ. ज्योती गाजरे, ह.भ.प कीर्तनकार गायत्री दुसाने आदी उपस्थित होते.
पुढे स्मिता जोशी म्हटल्या की, वाघेश्वरी महिला मंडळातर्फे उपदेश दिले, योग्य मार्गदर्शन केले. सध्या समाजात घटस्पोट, कुटुंबातील कलह , टोकाला जाणारे वाद हे सर्व मन खिन्न करणारे आहे. हे वाद टाळता यावे यासाठी पती -पत्नी या दोन्हीपैकी एकाने सामंजस्य याची भूमिका घ्यावी जेणेकरून कुटुंबात वाद कमी होतील. असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी उपस्थित महिलांना दिला. या प्रसंगी डॉ. ज्योती गाजरे यांनी महिलांना निरोगी जीवनशैली याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच गायत्री दुसाने यांनीही महिलांना “स्त्री शक्ती व आध्यत्मिकता यावर मनोगत व्यक्त केले.
वाघेश्वरी महिला मंडळातर्फे हा पहिलाच उपक्रम राबविण्यात आला. यात लहान मुले-मुली यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक ऍड. केतन सोनार यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा अहिरराव तर आभार जगदीश देवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाच्या प्रमिला चव्हाण, पूजा सोनार, नयना सोनार, निर्मला देवरे, मीना वाघ, दिपाली बिरारी, मनीषा सोनार, ज्योती सोनार,सुनीता देवरे,भारती पोतदार,आदींनी परिश्रम घेतले. वाघेश्वरी महिला मंडळाने सर्वाचे आभार मानले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम