नोटांचे बंडल लांबविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्याला पकडले.
खान्देश लाईव्ह | १२ नोव्हेंबर २०२२ | वृद्धाच्या हातातील ५० हजार रुपयांचे बंडल हिसकावून पळणाऱ्या संशयित आरोपीला रंगेहात पकडल्याची घटना चाळीसगाव शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेत घडली . याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप ताराचंद पाटील (वय-६६, ) हे ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगाव शहरातील बँक ऑफ बडोदा या शाखेत कामाच्या निमित्ताने पैसे काढण्यासाठी आले होते. बँक खात्यातून त्यांनी १ लाख रुपयांची रोकड काढली आणि बँकेत बाकड्यावर बसून ५०० रुपयांचे बंडल मोजत असताना त्याच्या शेजारी बसलेला रफिक हुसेन जाफरी व त्याच्या साथीदार याने हातातील ५० रुपयाची बंडल हिसकावली व पळ काढला. तोपर्यंत दिलीप पाटील यांनी आरडा ओरड केली असता येथील नागरिकांनी त्यांना पकडले. दरम्यान संशयित आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दिलीप पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टाकले करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम