मजदूर चेतना यात्रेमध्ये जिल्ह्यातील ५ हजार कामगारांचा सहभाग

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १२ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्रातील कामगारांच्या प्रश्नांवर कामगारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने दिनांक 6 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या काळामध्ये मजदूर चेतना यात्रेचे आयोजन केलेले आहे.सदरची मजदूर चेतना यात्रेची शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात करण्यात आली आहे.
मजदूर चेतना यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्यात दोन दिवस संपर्क अभियान,सभा,बैठका तसेच मेळावे असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
अमळनेर,चोपडा,धरणगाव,पाचोरा,भडगाव,चाळीसगाव,पाचोरा,जळगाव शहर,भुसावळ,दिपनगर,रावेर,यावल,मुक्ताईनगर येथील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार बांधवांचे मेळावे संपर्क अभियान,बैठका घेण्यात आल्या.

चेतना यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील 5000 (पाच हजार) पेक्षा जास्त कामगारांसोबत संपर्क करण्यात आला.विविध मागण्यांसाठी दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी मुंबई येथे महाराष्ट्रातून एक लाख कामगारांचा मोर्चाचा निर्धार यावेळी करण्यात आला.
मजदूर चेतना यात्रेचे नेतृत्व भारतीय मजूर संघाचे प्रदेश महामंत्री मोहन येनुरे,संघटनमंत्री श्रीपाद कुठासकर प्रदेश सचिव अॅड.विशाल मोहिते,प्रवीण अमृतकर,विभाग संघटन मंत्री सुरेशचंद्र सोनार,वीज कंत्राटी कामगार संघटनेचे संजय सुरोसे,ज्येष्ठ नागरिक संघाचे सुभाष भावसार,माजी जिल्हाध्यक्ष पी.जे.पाटील,जिल्हाध्यक्ष किरण पाटील,कार्याध्यक्ष विकास चौधरी यांनी केले.

यात्रेमध्ये जिल्ह्यातील कामगार महासंघाचे वितरण सचिव सचिन पाटील,नगरपालिका मजदूर संघाचे दीपक घोगरे,बांधकाम कामगार संघाचे सदाशिव सोनार,घरेलू कामगार संघाच्या सौ मंगलाबाई चौधरी,सोनाली ठाकरे,कामगार महासंघाचे प्रादेशिक सचिव यशराज मेढे,सर्कल सचिव श्री ज्ञानेश्वर पाटील,नगरपालिका मजदुर संघाचे आनंद गडे,निर्मितीचे आनंद जाधव,ऑर्डनन्स फॅक्टरी चे बी.बी.सपकाळे,महापारेषणचे हरिभाऊ वलकर,रावेर तालुका कामगार संघाचे हरीष जगताप,पाचोरा नगरपालिका संघाचे राकेश पतरोड,भुसावळ विभागीय अध्यक्ष तुषार झोपे,सुनील पाचपांडे,विजय जगताप,संजय आमोदकर,प्रवीण मिस्तरी,किशोर वाघ,आशाबाई पाटील,भिका पाटील,श्याम पाटील,जितेंद्र पिंगळे आधी कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मजदूर चेतना यात्रेनिमित्त भारतीय मजदूर संघ जळगाव जिल्ह्याच्या वतीने विविध सभांचे व मेळाव्यांचे आयोजन विभाग संघटन मंत्री सुरेश चंद्र सोनार जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी,बी.बी.सपकाळे,आत्माराम शिवदे,ज्ञानेश्वर पाटील,नारायण पाटील,पंकज पाटील,सुनील कोळी,गोपाळ चौधरी,किशोर पवार,उमाकांत खेवलकर,प्रकाश गोसावी,मंगलाबाई चौधरी,कैलास रोकडे,सुभाष थोरात यांनी केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like