मौजे निंभोरा स्टेशन उड्डाणपुलाची खा. रक्षा खडसे यांनी केली पाहणी
खान्देश लाईव्ह | १२ नोव्हेंबर २०२२ | मौजे निंभोरा स्टेशन (रावेर) येथे रेल्वे स्टेशन जवळ दोन्ही बाजूने निंभोरा व खिर्डी गावाचा मुख्य वाहतुकीचा रस्ता असल्याने रेल्वे विभागामार्फत सदर ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आलेला असुन, सध्या उड्डाणपूलाचे काम प्रगतिपथावर आहे. सदर ठिकाणी भेट देऊन उड्डाणपूलची पाहणी खा. रक्षा खडसे यांनी केली. तसेच रेल्वे अधिकाऱ्याकडून कामाच्या प्रगतीबाबत यावेळी माहिती घेऊन, योग्यत्या सुचना केल्या.
यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुका सरचिटणीस महेश चौधरी, . हरलाल कोळी, भाजयुमो तालुका सरचिटणीस शुभम पाटील, दुर्गेश पाटील, प्रमोद रोजोटकर, राजेंद्र महाले, रवींद्र महाले, विजय सोबर, राजू बोरसे, मनोज सोबर, . पप्पू कोळंबे, सचिन महाले, . आशिष बोरसे आदी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम