विवाहितेचा दोन लाखांसाठी छळ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ I माहेरहून शेतीसाठी दोन लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेच्या छळ करणाऱ्या दोन जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विवाहिता मनीषा रवींद्र काकडे (वय ३५, रा. वंजारी खपाट ता. धरणगाव) यांचा दि. ३१ डिसेंबर २०१४ पासून ते दिनांक २४ डिसेंबर २०२२ च्या दरम्यान माहेरुन शेतीसाठी २ लाख रुपये आणावे म्हणून छळ सुरु होता. सासु इंदुबाई लोटन काकडे व पती रविंद्र लोटन काकडे यांनी विवाहितेला वेळोवेळी शारिरीक व मानसिक त्रास देत चापटाबुक्यांनी मारहान केली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात सासु इंदुबाई काकडे व पती रविंद्र काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. राजू पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like