अल्पववयीन मुलीचा विवाह ; तीन जणांवर गुन्हा

खान्देश लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ I मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही तिचा विवाह केल्याप्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी विनोद बावस्कर, विनोद मोहन बावस्कर आणि अशोक दिलीप पाटील (सर्व रा. दसनूर ता. रावेर जिल्हा जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
१७ वर्षीय अल्पवयीन मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मला नवरी बनवून दुपारी ३ वाजता अशोक दिलीप पाटील (रा. छोटा वाघोदा ता.रावेर जि. जळगाव) यांच्या सोबत जबरदस्तीने लग्न लावले. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०२२ ते १३ नोव्हेंबर २०२२ रोजी पावतो अशोक पाटील यांनी कोणतीही जबरदस्ती केली नाही. परंतू मी वयाने लहान आहे, हे माहित असतांनाही अशोक पाटील यांनी माझ्या सोबतसाक्षी विनोद बावस्कर, विनोद मोहन बावस्कर (रा. दसनूर ता. रावेर) अशोक पाटील यांच्या इतर नातेवाईकांनी लावण्यास मदत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय पोहेकर हे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम