महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ I जामनेर तालुक्यातील भागदरा येथील ३५ वर्षीय विवाहितेचा घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महीला ह्या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. गावातील राहणारा दादाराव धेंडू जोगी याने २७ डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीला काहीही शिकवित असल्याचा संशयावरून महिलेला व तिच्या घरातील इतर एका महिलेला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच महिलेच्या घरात घसून तिचा हात पकडून विनयभंग केला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात महिलेने धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दादाराव जोगी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामदास कुंभार करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like