अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ I जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील गिरणा पंपिंग रोड वरून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मेहरूण येथील तलाठी यांनी कारवाई केली. दरम्यान, शासकीय कामात अडथळा निर्माण करून ट्रॅक्टर चालक वाळूचे ट्रॅक्टर घेवून पसार झाला. याप्रकरणी मंगळवारी २७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता ट्रॅक्टर चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारात असलेल्या गिरणा पंपिंग रोडवरून मंगळवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर मेहरूण येथील तलाठी राजू कडू बाऱ्हे यांनी पकडले. वाळू वाहतुकी संदर्भात परवाना विचारला असता परवाना नसल्याचे सांगून “तुम्हाला काय जे करायचे आहे, ते करा” असे म्हणून ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टरचालक पसार झाला. या संदर्भात मेहरून तलाठी राजू बाऱ्हे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता ट्रॅक्टर चालक सागर उर्फ शहा जिजाबराव पाटील रा. वैजनाथ ता. एरंडोल जि.जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like