श्रध्दा वालकर हत्याप्रकरणी मारेकऱ्यास फाशी द्या
खान्देश लाईव्ह | १८ नोव्हेंबर २०२२ | श्रध्दा वालकर ह्या तरूणीचा निर्घृण खून करणाऱ्या आफताब पुनावाला याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी. लव्ह जिहाद ची प्रकरणे हाताळण्यासाठी व त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांची विशेष शाखा स्थापन करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन हिंदू समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना शुक्रवारी देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालघर येथील आफताब पुनावाला याने श्रद्धा वालकर या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत होता. श्रद्धाने लग्न करण्याविषयी त्याच्याकडे आग्रह धरल्यानंतर आफताबने तिची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. ही घटना अतिशय सुन्न करणारी असून देशभरातील तरुणींमध्ये दहशत निर्माण झाले आहे. यासह विविध मागण्यांसाठी हिंदू समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता निवेदन देण्यात आले. संघटनेचे खान्देश उपाध्यक्ष महेंद्र कोळी, विशाल लोंढे, आकाश धनगर, विवेक जोशी, सोनू गायकवाड यांच्यासह आदी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम