खासदार राहुल गांधीयांना जीवे मारण्याची धमकी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १८ नोव्हेंबर २०२२ | भारत जोडो यात्रेदरम्यानकाँग्रेस खासदार राहुल गांधीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
इंदूरमध्ये बॉम्बनं उडवण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. हे इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात धमकीचं निनावी पत्र आलं आहे. दरम्यान, हे पत्र नेमकं कोणी दिलं? हे अद्याप समजलं नाही. याप्रकरणी पोलिस आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस जुने इंदूर पोलीस स्टेशन परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करत आहेत.
दरम्यान, येत्या 24 नोव्हेंबरला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा इंदूरच्या खालसा स्टेडियममध्ये विश्रांतीसाठी थांबणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना हे धमकीचं पत्र आलं आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like