पाचोरा येथून २ हजार काँग्रेस कार्यकर्ते रवाना

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १८ नोव्हेंबर २०२२ | शेगांव येथे झालेल्या कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सभेसाठी पाचोरा – भडगाव तालुक्यातील सुमारे दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले असून यासाठी पाचोरा आगारातील ३० बसेस बुक करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, याद्वारे आगाराला एका दिवसाचे ७ लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील व वाहतूक लिपिक संदिप पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. पाचोरा आगारातील ५४ पैकी ३० बसेस शेगांवसाठी गेल्याने पाचोरा तालुक्यातील काही ग्रामीण भागातील व काही लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र ज्या भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात त्या भागात निर्णयाप्रमाणे व वेळेवर बसेस सोडण्यात आल्याने विद्यार्थी वेळेत कॉलेज व शाळांमध्ये पोहचले.

पाचोरा आगारातून भडगाव तालुक्यासाठी १८ तर पाचोरा तालुक्यासाठी १२ आशा ३० बसेस शेगांवच्या राहुल गांधी यांच्या सभेसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बुक केल्या होत्या. यासाठी पदाधिकाऱ्यांनी सुमारे २६ ते २७ हजार रुपये डिपॉजीट भरले आहे. पाचोरा शहर व ग्रामीण भागात पहाटे ५ वाजता तर भडगाव तालुक्यात पहाटे ४ वाजता बसेस सोडण्यात आल्या होत्या. राहुल गांधी यांच्या सभेसाठी ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. आगारातील ५४ पैकी ३० बसेस शेगावला गेल्याने लांबपल्याच्या पूणे ५ पैकी २ , नाशिक २ पैकी १, मालेगाव ५ पैकी २, पिंपळगाव ४ पैकी २ बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवासांचे काही प्रमाणात हाल झाले. मात्र आगाराने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळली. प्रासंगिक करारातून गेलेल्या ३० बसेस मुळे पाचोरा आगारास ७ लाखाचे उत्पन्न मिळणार आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like