चाळीसगाव तालुक्यात घरफोडी ; १५ लाखांचा मुद्देमाल लंपास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १८ नोव्हेंबर २०२२ | चाळीसगाव तालुक्यातील बोढरे(लहान) गावातील एका घरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून सुमारे १५ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले असून या घटनेमुळे बोढरे गावात खळबळ उडाली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप चैनसिंग राठोड (वय-२१) रा. बोढरे लहान ता.चाळीसगाव जि.जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १६ नोव्हेंबर रात्री ११ ते १७ नोव्हेंबर सकाळी ४ वाजेच्या दरम्यान, घरातील सर्व झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून १० लाख रुपयांची रोकड आणि ५ लाख १९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण १५ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. संदीप राठोड यांनी तत्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकेश पवार तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like