वधू-वर परिचय मेळावे घेणे ही काळाची गरज- शालीग्राम मालकर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १८ नोव्हेंबर २०२२ | समाजातील अनिष्ट चालिरिती, रूढी, परंपरा यांच्या मागे न धावता विवाह संस्था टिकविण्यासाठी वधू-वर परिचय मेळावे घेणे ही काळाची गरज आहे, असे मत माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी केले.
जळगाव येथे 25 डिसेंबर रोजी माळी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा संपन्न होणार आहे. त्याप्रसंगी 17 रोजी अमळनेर येथे माळी समाज पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

यावेळी माळी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. नलिन महाजन, विभागीय उपाध्यक्ष भास्कर माळी, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्यामराव माळी सर, जिल्हा चिटणीस दगडू माळी, युवक जिल्हाध्यक्ष भीमराव महाजन,गांधली येथील प्रा. नितीन चव्हाण,आंबापिंप्री येथील रमेश माळी सर, कळमसरे येथील मुरलीधर चौधरी, प्रा. हिरालाल पाटील, नथु चौधरी, गजानन पाटील, पिंपळीचे रविंद्र महाजन आदी समाजबांधव यावेळी उपस्थित होते.
खानदेशातील समाजबांधव यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असेही आवाहन जिल्हाध्यक्ष श्यामराव माळी यांनी केले. डॉ. नलिन महाजन, प्रा. नितीन चव्हाण, यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील तर आभार भीमराव महाजन यांनी मानले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like