अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाचा निर्णय

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ नोव्हेंबर २०२२ | महिला बाल विकास विभाग शासन निर्णय दि.23 ऑगस्ट, 2021 अन्वये अ.ब.क श्रेणी नुसार अनाथ बालकांना शासनाच्या विविध सेवा सुविधा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अनाथाना शासकीय पदभरती आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी एकूण उपलब्ध उमेदवाराकडे महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित अनाथ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यापूर्वी महिला व बालविकास विभागाच्या क्षेत्रिय यंत्रणेकडून संबंधित अर्जदाराची कौटुंबिक पार्श्वभूमी व सदयस्थिती तसेच आवश्यक ती सर्व कागदपत्रे यांची तपासणी करुन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि बाल कल्याण समिती यांची शिफारस करण्यात येते. सुरुवातीपासून अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्याचे अधिकार हे केवळ विभागिय उपयुक्त, महिला व बाल विकास कार्यालय यानाच देण्यात आलेले आहेत.

तरी महिला व बालविकास विभागाच्या अधिका-यांव्यतिरीक्त अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देखील अनाथ प्रमाणपत्र वितरीत केते जाते असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे अनाथ प्रमाणपत्र वितरीत झाल्यास संबधित अर्जदारांची दिशाभूल होउन त्यांचे शैक्षणिक तथा इतर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच आई वडिलांच्या मृत्युमुळे सर्वसाधारण आयुष्यात वंचित झालेल्या अनाथ बालकांचे पुन्हा नुकसान होणे टाळावे तसेच, अनाथ प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत सुस्पष्टता यावी आणि याबाबत कोणतीही चुकीची कार्यवाही शासकीय यंत्रणाकडुन होऊ नये या दृष्टीने शासन परीपत्रक दिनांक 6 सप्टेंबर, 2022 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. तसेच पैशाची मागणी करणे व अनाथ प्रमाणपत्र मिळवून देणे बाबत संपर्क करुन आमिष दाखविणे अशा कोणत्याही व्यक्ती / संस्था कार्यालय याच्या अमिषाला बळी न पडता अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय /जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुसरा मजला आकाशवाणी केंद्राजवळ जळगाव, संपर्क 0257-2228828 येथे संपर्क साधावा तसेच अनाथ प्रमाणपत्रासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष जळगाव यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like