एक दिवसीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ नोव्हेंबर २०२२ | जिल्ह कोषागार कार्यालय जळगाव येथे 17 नोव्हेंबर, 2022 रोजी सर्व आहरण व संवितरण अधिकारी व प्रतिनिधी यांचे साठी कोषागारात सादर होणारी देयके, उपयोगिता प्रमाणपत्रे, तपशिलवार देयके, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, सेवा निवृत्त झालेल्या कर्मचारी यांच्या अडीअडचणी बाबत एक दिवसीय कार्यशाळा / चर्चासत्र अल्पबचत हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेले होते.

या कार्यशाळेस तहसिलदार (सामान्य शाखा) थोरात साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यशाळेस जिल्हा कोषागार अधिकारी श्री. निकुम साहेब यांनी मार्गदर्शन केले. श्री. घनश्याम चौधरी यांनी उपस्थित असलेल्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी व प्रतिनिधी यांचे प्रश्नावर / अडीअडचणीवर मार्गदर्शन केले,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. असे जिल्हा कोषागार अधिकारी श.वा. निकुम यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like