विद्यापीठात विद्यार्थ्यासाठी मुलाखतीचे आयोजन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २२ नोव्हेंबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष व युनिर्व्हसिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अंतर्गत बी.टेक (केमिकल इंजिनिअर) विद्यार्थ्यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राकेश अहिरे व चेतन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी युनिर्व्हसिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्लेसमेंट समन्वयक व केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे उपसमन्वयक डॉ. उज्वल पाटील, समन्वयक प्रा. रमेश सरदार व प्लेसमेंट ऑफिसर श्रीमती सोनाली दायमा यांनी व्यवस्थापन केले. या विद्यार्थ्यांचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, युनिर्व्हसिटी इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे संचालक प्रा. जे. बी. नाईक यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like