विहिरीत कुजलेल्या अवस्थेत डोंगर काठोऱ्याच्या तरुणाचा मृतदेह आढळला

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २२ नोव्हेंबर २०२२ | यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावातुन चार दिवसापुर्वी हरवलेल्या विवाहीत तरुणाचा गावाजवळच्या विहिरीत मृतदेह आढळला असून यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

गणेश दिलीप ढाके (वय ३२ वर्ष रा. डोंगर कठोरा, ता. यावल) हा तरूण दि. १८ नोव्हेंबरपासून हरवल्याची नोंद यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गणेश ढाके याचा मागील चार दिवसापासून सर्वत्र शोध सुरू असतांना अखेर आज मंगळवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास डोंगर कठोरा ग्रामपंचायतच्या गावातील विहीरीत गणेश मृत अवस्थेत मिळुन आला.

 

त्याचे शव ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. गणेश ढाके यांचे शव हे अत्यंत कूजलेल्या अवस्थेत असल्या कारणाने यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख, गावातील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांच्या उपस्थितीत जागेवरच मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत धनजय फालक यांनी खबर दिल्यावरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. गणेश यांच्या पश्चात पत्नी,दोन मुल , आई आहे . तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like