सोने चांदीत मोठी वाढ, सोने 55 हजारांचा दर ओलांडण्याची शक्यता

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ४ मार्च २०२२ | रशिया-युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस वाढत आहे. या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यवहारावर तर होतोच आहे. सोन्याचा वाढता दर पुन्हा एकदा आपल्या रेकॉर्ड स्तराजवळ वळतो आहे.

सोने आमि चांदी या दोन्ही धातूंच्या किंमतीत वाढ सुरूच आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. इतकंच नाही तर, येत्या काळात सोने 55 हजारांचा दर ओलांडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. एका आठवड्यात सोन्याचा दर आज 53 हजारांच्या पुढे गेला आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सध्या सोने 53 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पुढे पोहोचले आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. जळगाव सरफरे बाजारात सोन्याचा दर 53,000 हजार प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा दर आज 68,600 प्रति किलोवर पोहोचला आहे. दुसरीकडे, जर आपण चांदीबद्दल बोललो तर त्याची किंमत देखील 266 रुपयांनी वाढली आहे.

सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. रशिया युक्रेनमधील युद्ध सुरु होताच आर्थिक व्यवस्थादेखील ढासळू लागली आहे. सोन्याच्या दरात अचानक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 47 हजारांवर होता. एका आठवड्यात सोन्याचा दर आज 53 हजारांच्या पुढे गेला आहे.

जळगावमधील दर
सोने 53075
चांदी 70115

नाशिकमधील दर
सोने 53299
चांदी 70258

औरंगाबादमधील दर
सोने 53352
चांदी 70210

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like