भाजप कार्यकर्त्यांचा दिपनगर येथील अणुउर्जा औष्णिक केंद्रावर जोरदार निदर्शने
खान्देश लाईव्ह | ४ मार्च २०२२ | जळगाव शहरातील भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील अणुउर्जा औष्णिक केंद्रामध्ये सलग अनेक वर्षे काम करणारे कमलाकर मराठे यांना धक्का बसला आहे. सलग आठ वर्षे कमलाकर मराठे हे कामगार म्हणून कार्यरत होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून येथील ठेकेदारांनी त्यांना कामावरून निलंबित केले. वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदने दिली ,संबंधित अधिकारी यांची भेट घेतली.
आमदार-खासदार यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आणि आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर हे प्रकरण अधिकाऱ्यांनी मिटवण्याचा निर्णय घेतला.
परंतु आज दुपारी साडेचार वाजल्यापासून अधिकाऱ्यांनी भेटण्यासाठी बोलावले असता तरीदेखील या संबंधित कमलाकर मराठे यांना गेट मधून आत सोडले गेले नाही ,त्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.
कमलाकर मराठे यांना या वेळी कोणतेही अधिकारी या ठिकाणी भेटले नाहीत म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शक्तिगड या दिपनगर अनु ऊर्जा औष्णिक केंद्राच्या कार्यालयाच्या गेटवरती जोरदार निदर्शने केली.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम