चोरट्यांनी महाबळ परिसरातून केली दुचाकी वाहनांची चोरी
खान्देश लाईव्ह | ४ मार्च २०२२ | जळगाव शहरातील महाबळ परिसरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार सायकल चोरीच्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हरीओम नगर असोदा रोड जळगाव येथे प्रमोद दत्तू खरोटे (वय-४२) रा. हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते महाबळ परिसरात नोकरीला आहे. २ मार्च रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे दुचाकी (एमएच १९ एडी ६९८५) ने महाबळ परिसरात कामाला गेले. महाबळ येथील विद्यूत नगरी येथे त्यांनी त्यांची दुचाकी पार्क करून लावली होती.
रात्री ८ वाजता घरी जाण्याकरता काम आटोपून ते दुचाकीजवळ आले असता त्यांना जागेवर दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू कोठेही दिसली नाही. ३ मार्च रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम