एसटीच्या विभागीय कार्यशाळेत शिकाऊ उमेदवारांच्या भरती सुरू, १२८ जागांसाठी अर्ज

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ४ मार्च २०२२ | राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्‍यांसाठी मागील चार महिन्यांपासून संप पुकारला आहे. शहरातील एसटीच्या विभागीय कार्यशाळेत ट्रेडनिहाय शिकाऊ उमेदवारांच्या भरती सुरू करण्यात आली आहे. या करीता जळगाव आगारात गुरुवारी शेकडो उमेदवार मुलांनी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजेपासून कागदपत्रांच्या तपासणीला सुरुवात करण्यात येऊन सायंकाळी उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी सुरूवात करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यासह यवतमाळ, नाशिक, मुंबई, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतूनही मुलांनी सकाळपासूनच येथे गर्दी केली होती. एसटीच्या विविध ट्रेडच्या १२८ पदांच्या भरतीसाठी गुरुवारी मुलांना कागदपत्र तपासणीसाठी बोलवण्यात आले होते. कागदपत्रांची तपासणी व छाननी विभाग नियंत्रक भगवान जगनोर, यंत्र अभियंता चालक श्रावण सोनवणे, विभागीय कर्मचारी अधिकारी प्रशांत महाजन यांनी केली.

मॅकेनिक मोटार व्हेईकल ६०, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (पत्रे कारागीर) २४, मेकॅनिकल्स ऑटो इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स १३, वेल्डर २, पेंटर १, डिझेल मेकॅनिक २५, अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग १, अभियांत्रिकी पदवीधर २ अशा १२८ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. सर्वच जागांसाठी प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षाचा आहे, असे आगार प्रशासनाने सांगितले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like