गावठी हातभट्टीचे अड्डे तालुका पोलिसांकडून उध्वस्थ
खान्देश लाईव्ह | २१ नोव्हेंबर २०२२ | जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गावठी दारु भट्ट्यांवर उद्धवस्थ करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. तालुका पोलीस स्टेशनच्याहद्दीतील तीन गावांमधीलगावठी दारुच्या अड्ड्यांवरतालुका पोलीसांच्या पथकाने धाड टाकून, दारुचे अड्डे उध्वस्त केले आहेत. या कारवाईत पोलीसांनी पावणे दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट करत, पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावठी दारुचे अड्डे असून, भट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पध्दतीने दारू तयार करून विक्री केली जात आहे. त्याची माहिती तालुका पोलीसांना मिळाल्यानंतर शनिवारी सायंकाळी व रविवारी सकाळी ही कारवाईचे सत्र राबविण्यात आले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील भोलाणे या गावात तापी नदीच्या काठालगत भीमराव कोळी यांच्या हातभट्टीवर धाड टाकण्यात आली.
या कारवाईत 19 ड्रम कच्चे व गरम 3400 लिटर रसायन चालू भट्टीतील दारुसह एकूण 87 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. यासह गाढोदा येथे प्रवीण भगवान सोनवणे यांच्या गावठी हातभट्टीचा दारुचा अड्डा उध्वस्त करण्यात आला. तिसरी कारवाई खोटेनगर येथील आरोपी जयवीर राजपुत याच्या ताब्यात देशी दारू बॉटल मिळून आल्या. या कारवाईत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.यासह दापोरा शिवारातील कुरकुर नाल्याजवळ अशोक उर्फ काल्या रामदास सोनवणे याच्या 4 ड्रम कच्चे व गरम 700 लिटर रसायन चालू भट्टी वरील तयार दारू सह 19 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम