भुसावळात विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २१ नोव्हेंबर २०२२ |भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील हिमालय पेट्रोल पंपाजवळ आदित्य सावकारे या विद्यार्थ्यावर शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाहाटा कॉलेजमध्ये एक महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. एकमेकांकडे खुन्नसने पहातो म्हणून आपसात वाद होत होते. या वादाचे रूपांतर शुक्रवारी थेट चाकू हल्ल्यात झाले. हिमालय पेट्रोल पंपाजवळ आदित्य कैलास सावकारे (१७) या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार करण्यात आल्याने तो जबर जखमी झाला होता. त्याच्यावर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार केल्यानंतर त्यास खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like