जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ नोव्हेंबर २०२२ | नोकरीत वेळ निघून जातो. सृजनशीलता, नावीन्याचा ध्यास आणि सतत कामाची सवय संपून जाते. मात्र उद्योगात अमर्याद संधी आहेत. जशी मेहनत कराल, तसे यश मिळते. मात्र उद्योग, व्यवसाय करण्यासाठी स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे, असे मनोगत जळगाव येथील विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती यांनी जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयामधील प्रथम वर्ष एमबीए व एमसीए या विभागाच्या इंडक्शन कार्यक्रमावेळी व्यक्त केले.

 

याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, एमबीए विभागप्रमुख प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया, एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेत नमूद केले की, रायसोनी इस्टीट्युट सदैव दर्जात्मक शिक्षण देण्यास आग्रही असते. करिअरच्या ठरलेल्या वाटांसोबतच वेगळ्या चाकोरी मोडणाऱ्या नवीन वाटांची ओळखही या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना होईल. आपली आवड व क्षमता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन करिअरची योग्य निवड कशी करावी ? करिअरच्या अवघड टप्प्यांवर कोणत्या गोष्टींचा विचार करावा ? या विषयांवर करिअर समुपदेशक व प्रसिद्ध उद्योजक प्रमोद संचेती हे उपस्थित विदयार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातील प्रश्न नक्की सोडवतील असे आपल्या प्रास्ताविकेत प्रा. डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले

 

तसेच आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात श्री. संचेती पुढे म्हणाले की, काही वेळा व्यवसायात मोजक्या लोकांना अपयशाला सामोरे जावे लागते.त्याचे कारण त्यांच्याकडे चांगली टीम नसते. व्यवसायात आपली मुळे बळकट करण्यासाठी आणि व्यवसायात यश संपादन करण्यासाठी चांगले कामगार आणि कार्यसंघ असावे. तसेच प्रत्येक उद्योजकाचा आपल्या टीमवर विश्वास असणे फार गरजेचा असून आपला उद्योग हा आपण तेथे असताना किंवा नसतानाही यशस्वीरित्या सुरु असायला हवा, म्हणजेच कि आपल्या उद्योगातील कर्मचाऱ्याची टीम इतकी बळकट व परिपूर्ण असायला हवी कि आपला उद्योग हा ऑटोपायलट सुरु असेल आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या उद्योगात कार्यकुशल व्यक्तीची नेमनुक करून त्यांच्यावर विश्वास टाकु, वेळोवेळी आपल्या टीमच्या सदस्यांना प्रोत्साहन देवू तसेच सूक्ष्म व्यवस्थापन करण्याच्या भानगडीत पडू नका, कर्मचाऱ्यानी काही छोट्या मोठ्या चुका केल्यात तरी त्याकडे दुर्लक्ष करा, कारण या चुकांमधूनच आपली टीम डेव्हलप होत असते. तसेच आपण सुरु केलेल्या उद्योगात प्रत्येक गोष्ट आपणच करावी हा हट्टहास सर्वात आधी सोडून द्या. तसेच टीम बिल्डिंग ही सामायिक कामगिरी सुधारण्याची प्रक्रिया आहे ती वाढवा. आजच्या युवकांनी टीम मध्ये काम करत असतांना स्वताच क्रेडीट, प्रतिमा इतकी बळकट करायला हवी कि आपल्या स्कीलमुळे आपले वरिष्ठ आपल्यावर विश्वास टाकून आपल्या प्रगतीला सपोर्ट करणारे कार्य आपल्याला देवू शकतील. त्यामुळे आजच्या युवकांनी सदैव चोकस नजर ठेवत कार्यतत्पर राहावे. तसेच व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कामाची योग्य पद्धत असावी. यामध्ये काम करणाऱ्यांची सहमती आवश्यक आहे. कामाच्या नवनवीन पद्धती अवलंबवा. कामात नाविन्यता नसेल तर व्यवसायात यश मिळवणे अवघड आहे. व्यवसायात ग्राहकच सर्वकाही आहे.

 

आपण उत्पादन कितीही चांगले निर्मित केले जर ते ग्राहकांना आवडले नाही तर आपण काहीही करू शकत नाही. म्हणून वेळोवेळी ग्राहकांचा अभिप्राय घ्यावा. तसेच आपल्याला जीवनात प्रगती आणि यशाकडे जायचे असेल, तर उद्योग व्यवसायालाच प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. राज कांकरिया यांनी देखील बदलत्या काळातील उद्योग-व्यवसायात संधी कशा ओळखाव्यात याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. राहुल त्रिवेदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच प्रा. श्रिया कोगटा यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रीतम रायसोनी यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like