एरंडोल येथे विहिरीत बुडाल्याने एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ नोव्हेंबर २०२२ | एरंडोल येथील एकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. शहरातल्या आनंद नगरातील रहिवासी बलराम रामसिंग कातारी वय ३९ वर्षे याचा विहिरीच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी घडली. ते विहिरीत पडल्याचे समजताच त्यांना लोकांनी विहिरीत बिलाई टाकून वर काढले व खाजगी वाहनाद्वारे एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले असता तपासणी अंती तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.

या घटनेबाबत हिरा मोती कातारी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली. यात मृत बलराम कातारी हा प्रल्हाद कातारी यांच्यात राहत होता. तसेच त्याला दारू पिण्याचे व्यसन होते म्हणून त्याची पत्नी १०ते १५ वर्षांपासून तीच्या माहेरी नाशिक येथे गेली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार संतोष चौधरी,जुबेर खाटीक हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like