रोटरी क्लब जळगावतर्फे मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया
खान्देश लाईव्ह । २० एप्रिल २०२२ । जळगाव येथील रोटरी क्लब जळगाव, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट, प्रभाकर पाटील हॉस्पिटल आणि पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया तसेच पापणी पडणे याविषयी तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आहे.
नेरी नाक्याजवळील यशवंत मुक्तांगण येथील प्रभाकर पाटील हॉस्पिटल येथे २२, २३ व २४ एप्रिल रोजी हे मोफत शस्त्रक्रीया शिबीर होणार आहे. शिबिरासाठी पुणे येथून डॉ.मधुसुदन झंवर, डॉ.भांगे, डॉ.वनारसे, डॉ.राजेश पवार व २० तज्ज्ञ डॉक्टर्स येणार आहेत. रोटरी क्लब जळगावचे हे पाचवे शिबीर तर पुणे नेत्रसेवाचे १७७ वे शिबीर आहे.
तरी गरजू रुग्णांनी मोठ्या संख्येने शिबिराचा फायदा घ्यावा, असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष संदीप शर्मा, मानद सचिव मनोज जोशी व प्रकल्प प्रमुख डॉ.तुषार फिरके यांनी केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम