बोरगांव शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । २२ एप्रिल २०२२ । शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोरगांव, केंद्र जातोडा येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. येत्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात पहिलीमध्ये दाखलपात्र असलेल्या बालकांसाठी शासनाकडून शाळापूर्व तयारी अभियान हा बारा आठवड्यांचा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविला जात आहे. त्या अनुषंगाने बोरगांव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

गावात प्रभातफेरी काढून मेळाव्याची जनजागृती करण्यात आली, त्यासाठी स्वयंसेवकांची देखील नेमणूक करण्यात आली होती. शाळेतील वर्ग खोली विविध फलकं लावून सजवण्यात आली होती.

या प्रसंगी बोरगांवचे उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या शुभहस्ते बालकांसाठी शाळापूर्व तयारी संच व विकास पत्र पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. शिरपूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जी. पी. कुमावत व केंद्र प्रमुख अनिल बाविस्कर यांनी बोरगाव मराठी शाळेच्या अभियानास शुभेच्छा दिल्या.

सन २०२२-२०२३ मध्ये इयत्ता पाहिलीत दाखल होणाऱ्या मुलांची शाळापूर्व तयारी करून घेणे, NEP २०२० च्या अंमलबजावणीस प्रारंभ करणे तसेच मागील दोन वर्षात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढणे या मुख्य उद्देशाने महाराष्ट्रातील सर्व सरकारी शाळामध्ये शाळापूर्व तयारी अभियान राबविले जात आहे.

यावेळी सरपंच काशिबाई भिल, उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू भिल, ग्रामसेवक पी बी सोनवणे, पोलीस पाटील मनोहर पाटील, दशरथ भिल, पिरन न्हावी, अंगणवाडी मदतनीस, विद्यार्थी-पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिक्षक गणेश पाटील यांनी शाळापूर्व तयारी मेळाव्याचे प्रास्ताविक केले तर मुख्याध्यापिका अनिता जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like