आयएफआरएम जळगाव चॅप्टरच्या अध्यक्षपदी डॉ. शास्त्री, सचिव डॉ. राणे

रोटरी कलावंतांनी सादर केला सांस्कृतिक कार्यक्रम

बातमी शेअर करा

दै. बातमीदार | 25 एप्रिल 2022 | जळगाव रोटरीच्या ‘इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटेरीयन म्युझिशीयन्स अर्थात आयएफआरएम जळगाव युफोरिया चॅप्टरच्या अध्यक्षपदी डॉ. विजय शास्त्री यांची तर सचिवपदी डॉ. सुशीलकुमार राणे व कोषाध्यक्षपदी सी.ए. स्मिता बाफना-बंदुकवाला यांची निवड करण्यात आली आहे. आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. दीपक आठवले, आयएफआरएमचे व्हाईस चेअरमन एस. पद्मनाभन, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, डॉ. रश्मी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाची सूत्रे स्वीकारली.

मायादेवी नगरातील रोटरी भवनमध्ये रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने आयोजित केलेल्या या पदग्रहण सोहळ्यास रोटरी क्लब ठाणे येथील अनुजा चिटणीस, पल्लवी सुळे, अनिरुद्ध नखवा, श्याम मांडीवाले, महेश पेडणेकर, शैलेश मुळे यांची विशेष उपस्थिती होती.

नूतन कार्यकारिणीत रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. राजेश पाटील, अ‍ॅड. सूरज जहाँगीर व सुनील सूद, अतुल कोगटा यांचा समावेश आहे. रोटरी सदस्यांमधील गायन व संगीत यामधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे.
शुभारंभानिमित्त झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबई येथील एस. पद्मनाभन, पल्लवी सुळे, अनुजा चिटणीस, अनिरुद्ध नखवा, श्याम मांडीवाले यांच्यासह आ. संजय सावकारे, डॉ. राजेश पाटील, अतुल कोगटा, संजय बारी, विकास कात्यायानी, शंकरलाल पटेल, डॉ. नितीन दावलभक्त, शिल्पा सफळे, अनुषा महाजन, अ‍ॅड. सूरज जहाँगीर, डॉ. विजय शास्त्री, डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. सुशीलकुमार राणे, डॉ. नारायण आर्वीकर, डॉ.माया आर्वीकर, संदीप जोशी आदींनी विविध चित्रपटातील 29 गिते सादर केली.

परिचय डॉ. रेखा महाजन यांनी करुन दिला. पदग्रहण सोहळ्याचे सूत्रसंचालन अ‍ॅड. सूरज जहाँगीर, यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रंचालन डॉ. उषा शर्मा यांनी केले. कार्यक्रमास रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like