अग्निशमन सुरक्षा सप्ताहातंर्गत नवजीवन प्लसमध्ये मॉक ड्रील

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । २० एप्रिल २०२२। आगप्रतिबंधक व जीवसंरक्षणाच्या दृष्टीकोनातून नागरींकांमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने दि. १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन विभागामार्फत राज्यभरात अग्निशमन सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातंर्गत शहरातील नवजीवन प्लस येथील कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेऊन आज (दि. २०) अग्निशमनाचे मॉक ड्रील घेण्यात आले.

कोणत्याही देशात संरक्षणाची चौथी फळी “अग्निशमन सेवा” असे मानण्यात येते. अग्निशमन सेवेचे कार्य सामान्यपणे, आगीपासून संरक्षण करणे, आगीचा प्रतिबंध करणे व सेवेचा परिणामकारकरित्या वापर करुन जिवीत व वित्त हानी टाळणे हे असल्याने या सप्ताहातंर्गत शाळा, कॉलेज, रहिवाशी इमारती औदयोगिक इमारती येथे अग्निशमनबाबत माहिती व प्रात्यक्षिके दाखविण्यात येतात.

बहुतेक प्रतिष्ठानांमध्ये अग्निशमन यंत्रणा असली तरी त्याचा वापर कसा करावा याची त्या प्रतिष्ठानातील कर्मचाऱ्यांना सखोलपणे माहिती नसते. सर्वच नागरिकांना प्रत्यक्ष प्रात्याक्षिकाद्वारे अग्निशमन कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने नवजीवन प्लसमधील कर्मचाऱ्यांना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना फायर डेमो दाखविण्यात आला. आग कशी लागते आपण कशाप्रकारे त्यावर नियंत्रण मिळवू शकतो व घरातील एलपीजी गॅस सिलेंडर बद्दल सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.

या मॉकड्रील प्रसंगी नवजीवन प्लसचे संचालक अनिल कांकरिया यांच्यासह बहिणाबाई पार्क येथील स्टोअर्समधील कर्मचारी सहभागी झाले होते. या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनासाठी मनपा अग्निशमन विभागाचे फायर ऑफिसर शशिकांत बारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी सुनिल मोरे, हेड फायरमन अरवजीत घरडे तसेच अग्निशमन कर्मचारी प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, विक्रांत घोडेस्वार, तेजस जोशी, सोपान कोल्हे, नितीन बारी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like