शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी बहुळा धरणातुन सोडले पहिले आवर्तन
खान्देश लाईव्ह | २१ नोव्हेंबर २०२२ | शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी बहुळा धरणाचे पाण्याचे पहिले आवर्तन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते २० नोव्हेंबर रोजी वेरुळी येथे सोडण्यात आले.
गेल्या तिन वर्षांपासून बहूळा धरण हे सलग तिसऱ्यांदा शंभर टक्के भरल्याने यंदा शेतीसाठी तीन आवर्तन सोडण्यात येणार आहेत. यामुळे हडसन, वडगाव, दुसखेडा, नांद्रा, लासगाव, सामनेर, वेरुळी, खेडगाव (नंदीचे) येथील शेतकऱ्यांना रब्बी साठी व कोरडवाहू शेतीला फायदा होणार आहे.
वेळेवर सुटलेल्या या आवर्तनामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी मा. जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, मा. पंचायत समिती सभापती पंढरीनाथ पाटील, शरद पाटील, नांद्रा ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवाजी तावडे, प्रमोद सुर्यवंशी, प्रविण ब्राम्हणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, अवी पाटील (लासगाव), संदीप पाटील (खेडगाव), वेरुळी ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान पाटील, बाळू पाटील, अशोक पाटील, ब्रिजलाल संघवी, कैलास पाटील, अभिमन बाविस्कर, शशी महाजन, अनिल द्यावे, संदीप राजपूत, योगेश पाटील, बंडू सोनार, बहूळाचे उपविभागीय अभियंता राहुल शेवाळे, शाखा अभियंता श्री देशमुख, कालवा निरीक्षक के. एल. शिंदे, पाटकरी शिवदास महाजन, रमेश पाटील यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहुळा मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता राहुल शेवाळे यांनी यावेळी सांगतिले की, २० क्विसेस पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. जसजशी शेतकऱ्यांची मागणी वाढेल तसतसे पाणी सोडण्यात येईल.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम