अमळनेरात झोका खेळणाऱ्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
खान्देश लाईव्ह | २१ नोव्हेंबर २०२२ |एका पंधरा वर्षाच्या मुलाचा झोका खेळत असताना गळ्याला गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना अमळनेर शहरातल्या मुंदडा नगर भागात घडली आहे. वेदांत संदीप पाटील(वय १५ वर्ष) असे मयत मुलाचे नाव आहे.
वेदांत हा विद्यार्थी रविवारी आपल्या घरी झोका खेळत अभ्यास करत होता. यावेळी झोका गरगर फिरून त्याची मान त्यात अडकली. यात त्याचा दुर्दैवी अंत झाला.
या दुर्दैवी घटनेत मयत झालेला वेदांत पाटील हा इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती समोर आली असून तो सुशिक्षित कुटुंबातील असून त्याचे आई वडील हे दोघेही शिक्षक आहे. मागील ३ महिन्या पूर्वी सोनी मराठी या मराठी वाहिनीवर प्रसारीत होणार्या कोण होणार मराठी करोडपतीया मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.त्या शिक्षिका जयश्री पाटील यांचा तो मुलगा आहे. वेदांतच्या या ओढवलेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण अमळनेर तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम