पोलिसांत तक्रार दिल्याने एकावर ताणली पिस्तूल
खान्देश लाईव्ह | २१ नोव्हेंबर २०२२ | पाचोरा तालुक्यातील सातगाव (डोंगरी)येथील ज्ञानेश्वर अहिरे यांनी पिंपळगाव (हरेश्वर) ता. पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्या विरोधात तक्रार दिल्याने दि. १९ रोजी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान तीन अज्ञातांनी बंदूक रोखून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर अहिरे यांनी तिघांविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील ज्ञानेश्वरअहिरे यांनी त्यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी बंदूक ताणल्याची तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश्वर अहिरे यांनी चार दिवसांपूर्वी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या अंतर्गत परिसरात अवैध धंदे बंद व्हावेत. असे निवेदन सदर पोलिस स्टेशनला देण्यात आल्याने,त्यांच्यावर . १९ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मी गावातील बस स्टँड जवळील पुलावर एकटाच जात असतांना माझ्यावर तीन अज्ञातांनी शिवीगाळ करून बंदूक ताणली.
यावेळी झटापट होत असतांना झालेल्या आवाजाने जवळच असलेले नागरिक पळत आले. त्यामुळे सदर तिघेही इसम मोटरसायकल घेऊन पसार झाले. त्या रात्रीच संशयित तीन अज्ञातांच्या विरोधात ज्ञानेश्वर अहिरे यांनी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेश वाघमारे व बीट हवलदार रवींद्र पाटील पुढील तपास करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम