जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ ऑलंम्पिक गेम्स 2022-23 साठी रवाना

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । १ जानेवारी २०२३ । जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ महाराष्ट्र ओलंपिक गेम्ससाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्र ओलंपिक गेम्स 2022-23 च्या स्पर्धा दि. 2 ते 6 जानेवारी 2023 दरम्यान नागपूर येथील मानकापूर स्टेडियममध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी हा संघ आपली छाप सोडण्यासाठी रवाना झाला आहे.

महाराष्ट्रातून पुरुषांचे आठ संघ पात्र झालेले आहेत. यामध्ये जळगाव, नागपूर, ठाणे, पुणे, ग्रेटर मुंबई, नाशिक, सांगली, पालघर या संघांचा समावेश आहे. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन चा संघसुद्धा यामध्ये पात्र ठरलेलाआहे. जळगावचा पुरुष संघ महाराष्ट्र ओलंपिक गेम्स 2022 – 23 मध्ये सहभागी होणे ही जळगावच्या संघासाठी ऐतिहासिक आणि गौरवाची बाब आहे. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या संघात शुभम पाटील, प्रणव पाटील, दीपेश पाटील, गोपाल पाटील, उमेर देशपांडे, ओजस सोनवणे, अथर्व शिंदे, देवेश पाटील, सुफियान शेख, किशोर सिंह सिसोदिया यांची निवड झाली आहे. या खेळाडूंसोबत प्रशिक्षक अमोल पाटील, संघ व्यवस्थापक विनीत जोशी हे नागपूरला होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाले आहे. जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष तेजेंद्र महिंद्रा, सचिव विनीत जोशी, सहसचिव तनुज शर्मा, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य शेखर जाखेटे व जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह यांनी पुढील स्पर्धेसाठी संघाचे कौतूक केले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like