३५ वर्षीय महिलेचा विनयभंग

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । १ जानेवारी २०२३ । पाचोरा तालुक्यातील बाळद येथील एका ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील बाळद या गावात ३५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बाळद शिवारातील शेतात काम करत असताना गावात राहणारा समाधान नाना चित्ते (वय-३०) याने महिलेजवळ येऊन तिचा पाठलाग केला. दरम्यान तिच्या तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी महिल्याने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी समाधान नाना चित्ते यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like