दाम्पत्यासह मुलाला शिवीगाळ करून बेदम मारहाण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । १ जानेवारी २०२३ ।अमळनेर तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथे काहीही कारण नसतांना दाम्पत्यासह मुलाला शिवीगाळ करून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथील रहिवाशी प्रभाकर धुडकू पाटील (वय-२४) हे अपल्या पत्नी व मुलासह वास्तव्याला आहे. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना गावातील मच्छिंद्र चंद्रसिंग जाधव, राजेंद्र चंद्रसिंग जाधव, अविनाश प्रताप जाधव, नितीन छोटू जाधव, मनोज संजय जाधव, प्रेम अविनाश जाधव आणि अमोल छोटू जाधव सर्व रा. रामेश्वर खुर्द ता. अमळनेर यांनी दारूच्या नशेत येवून प्रभाकर पाटील यांनी शिवीगाळ केली तर त्यांची पत्नी लताबाई पाटील आणि मुलगा संदीप यांना बेदम मारहाण केली. यात तिघे जण गंभीर जखमी झाले. तिघांना जीवेठार मारण्याची धम‍की दिली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक लक्ष्मीकांत शिंपी हे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like