विवाहितेला प्लॅट घेण्यासाठी १० लाखांची मागणी
खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I नाशिक येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जळगाव शहरातील वाघ नगरातील माहेर असलेल्या योगिता प्रशांत सावळे (वय-30) यांचा विवाह मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा येथील प्रशांत चांगो सावळे यांच्याशी सन-२०२१ मध्ये रीतीरीजानुसार झाला. लग्नाच्या काही महिन्यानंतरच पती प्रशांत सावळे याने विवाहितेला नाशिकमध्ये फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आण अशी मागणी केली. विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्याने राग मनात धरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात झाली. यासाठी सासू, ननंद, नंदोईभाई यांनी देखील पैशांचा तगादा लावला. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहिता ह्या माहेरी निघून आल्या. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पती प्रशांत चांगो सावळे, सासू विमल चांगो सावळे, ननंद रेखा सोपान खराटे, नंदोई भाऊ सोपान मधुकर खराटे, नणंद मीना विनोद वानखेडे, नंदोई भाऊ विनोद श्रीराम वानखेडे सर्व रा. चिंचखेडा ता. मुक्ताईनगर या ६ जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम