जळगावात श्री दत्त जन्मोत्सव साजरा

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I शहरातील प्रताप नगर येथील स्वामी समर्थ केंद्रात हजारो भाविकांच्या उपस्थितीत बुधवार, ७ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
श्री दत्त जयंती निमित्ताने जळगावातील प्रताप नगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रावर दत्त जयंतीनिमित्ताने आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. पहाटेपासून पालखी सोहळा, गुरुचरित्र अध्याय , मंत्रपुष्पांजली महाआरती यासह महाप्रसाद अशा विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असल्याचे पाहायला मिळालं. सकाळपासूनच भाविकांनी हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी गर्दी केली होती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने स्वामी समर्थ केंद्र परिसर दुमदुमले होते. श्री दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर या स्वामी समर्थ केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून अखंड नाम यज्ञ सप्ताह तसेच विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. साडेसहाशे भाविक श्री दत्त पारायनाला बसले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम