गांजा प्रकरणी संशयिताला अटक !

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I अप कर्नाटक एक्स्प्रेसमधून सव्वा लाख रुपयांचा गांजा शुक्रवार, 2 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाने गस्तीदरम्यान जळगाव-शिरसोलीदरम्यान जप्त केला होता. या प्रकरणी अटकेतील समशोद्दीन ऐनोद्दीन पिंजारी (62, घर नं.89, सर्वे नं.55, शफीनगर, मालेगाव, जि.नाशिक) यास अटक करण्यात आल्यानंतर त्याने हा गांजा सप्लायर हासीराम चव्हाण याने दिल्याची कबुली दिली. यानंतर दुसर्‍या आरोपीच्या चोपड्यातून मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास 7 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like