तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत मुदत

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ नोव्हेंबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी बी.टेक. प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रिक्त जागांकरीता इच्छुक विद्यार्थ्यांना दि. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. सदर अभ्यासक्रमांसाठी रिक्त जागांची परिपूर्ण माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.nmu.ac.in) उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना / पालकांना आवाहन करण्यात येते की, अधिक माहितीसाठी रसायन तंत्रज्ञान संस्थेतील डॉ. पवन डी. मेश्राम (मो.नं. 8072276922) व डॉ. तुषार डी. देशपांडे, समन्वयक (मो.नं. 8956140966) यांचेशी संपर्क साधावा असे संचालक प्रा.जे.बी. नाईक यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like