विद्यापीठात परीसर स्वच्छता उपक्रम

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ नोव्हेंबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळेच्या वतीने विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने परीसर स्वच्छता उपक्रम घेण्यात आला.

स्वच्छेतेचा सराव हा विषय विद्यार्थ्यांच्या पाठ्यक्रमाचा एक भाग आहे. या उपक्रमाच्यावेळी हिंदी विभाग प्रमुख प्रा. सुनील कुलकर्णी, मराठी विभाग प्रमुख प्रा. म.सु. पगारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशाळेच्या संचालक प्रा. मुक्ता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशाळेचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पाटील तसेच दीपक खरात, डॉ. सुदर्शन भवरे, डॉ. प्रिती सोनवणे, सुनील अहिरे, योगेश शिंदे, बाळासाहेब सुर्यवंशी, उज्वला लांडगे, तुषार सोनवणे, भरत पालोदकर, दीपक बागुल यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like